Breaking

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

आज महाड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचा आज संपाचा सलग चौथा दिवस*



* महाड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचा आज संपाचा सलग चौथा दिवस*


आज या संपाला भेट देण्यासाठी उपस्थित *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा महाडच्या नगराध्यक्ष *स्नेहल माणिक जगताप* उपस्थित राहिल्या. या वेळी नगराध्यक्ष स्नेहल माणिक जगताप यांनी कामगारांना आश्वासन दिले की मी 
*एसटी कामगारांच्या पाठीशी ठाम पणे उभी राहणार*
कामगारांच्या मागणीसाठी   राज्याचे मा. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री तसेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले यांना कामगारांच्या मागण्या मान्य करा असे पत्र देणार असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत पाणी पुरवठा सभापती मयुरी शेडगे,तालुका काँग्रेसचे खजिनदार जगदीश पवार ,श्रीकांत राठोड उपस्थित होते.
  या वेळी वाहक श्री आंबेतकर,कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास देशमुख, सचिव श्री पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बहुसंख्य कामगार   उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा