उस्मानाबादेत येथे 12 हजार वह्याचे वाटप,
खा,शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, संजय दुधगावकर यांचा उपक्रम.
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.14) उस्मानाबाद येथे गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीच्या वतीने 12 हजार वह्याचे वाटप करण्यात येत आहे. शहरातील कोर्टाच्या बाजूला मेघमल्हार हॉटेल येथे दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते वह्याचे वाटप होणार आहे. त्यामुळे गरजू विद्यार्थी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा