*स्व. सा.पो. आयुक्त सुहास अनपट यांच्या मातोश्री विठाबाई अनपट यांचे निधन*
बेंबळे।प्रतीनीधी।
हरीनगर - बेंबळे(ता.माढा) येथील रहिवासी असलेल्या विठाबाई शिवाजीराव अनपट ( सध्या कर्वे रोड, पुणे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सोलापूरचे सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर असताना निधन झालेले स्वर्गीय सुहास अनपट व इंडियन नेव्ही ब्रिगेडियर कमांडर म्हणून कोचीन येथे शासकीय सेवेत कार्यरत असलेले सतीश अनपट यांच्या त्या मातोश्री होत्या व तसेच हरीनगर- बेंबळे येथील सामाजिक कार्यकर्ते व इंग्लिश मेडियम शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पोपटतात्या अनपट यांच्या त्या चुलती( काकी) होत्या. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, याप्रसंगी अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा