Breaking

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

सोलापूर जिल्ह्यातील शेततळ्यासाठी 12 कोटी रुपये अनुदान प्राप्त....आमदार बबनदादा शिंदे 'रक्कम बँक खात्यात वितरित करण्याचे काम सुरू'



सोलापूर जिल्ह्यातील शेततळ्यासाठी 12 कोटी रुपये अनुदान प्राप्त....आमदार बबनदादा शिंदे


 'रक्कम बँक खात्यात वितरित करण्याचे काम सुरू'


बेंबळे।प्रतीनिधी।    aj24taas News Maharastra Network         
                        
सोलापूर जिल्ह्यातील शेततळ्यासाठी 12 कोटी रुपये अनुदान शासनाकडून प्राप्त झाले असून त्याचे वितरण जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय कृषी कार्यालयातून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याचे काम  सुरू झालेले आहे अशी माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
       सविस्तर वृत्तांत असा की मागेल त्याला शेततळे ही योजना 2016--17 पासून शासनामार्फत अंमलबजावणी करण्यात आली होती. कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारण माध्यमातून उपलब्धता वाढवण्यासाठी शासनामार्फत ही योजना तयार  करण्यात आली व राज्यात 1 लाख शेततळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या नुसार शेतकऱ्याकडून ऑनलाइन अर्ज  मागवण्यात आले होते. यासाठी वेगवेगळ्या आकारमानाचे शेततळे व त्यानुसार अनुदान देण्याचे नियोजन ठरले होते.
        अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की 2016-17  ते 2019-20 पर्यंत सोलापूर जिल्ह्यातून 47025 शेतकऱ्यांचे शेततळ्यासाठी अर्ज आले होते व मान्यता मिळालेल्या पैकी 12470 शेततळ्यांची कामे पूर्ण होऊन 2020-2021 मार्च  पर्यंत 10018 शेततळ्यांना 45 कोटी 79 लाख 11हजार रु. एवढे अनुदान शासनाकडून वितरित करण्यात  आले होते. निधी उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील 2452 शेततळ्यांचे अनुदान प्रलंबित राहिले होते. आमदार बबनदादा शिंदे यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती व या उर्वरित शेतकऱ्यांनाही शेततळ्याचे अनुदान मिळावे म्हणून निधी उपलब्धतेसाठी  शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता शासनामार्फत 12 कोटी 1 लाख 48 हजार रु. अनुदान निधी प्राप्त झाला असून  जिल्ह्यातील प्रत्येक तालुका  स्तरावरील कृषी कार्यालयामार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम वितरित करण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याचेही आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले. शेततळ्याचे अनुदान मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील संमंधीत शेतकऱ्यांच्या कडून समाधान व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा