Breaking

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल नाका येथे,बहुजन रयत परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले*



*तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल नाका येथे,बहुजन रयत परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले*



आज दिनांक,३० डिसेंबर २०२१,रोजी बहुजन रयत परिषदेच्या विविध मागण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन करून पोलिस निरीक्षक तामलवाडी पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले,निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सौ कोमल ताई साळुंखे ढोबळे महिला प्रदेशाध्यक्षा बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य यांना आळेफाटा येथील टोलनाक्यावर गाडी अडवून अपशब्द वापरणाऱ्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करावा.तसेच तामलवाडी येथील  IRB.च्या टोल नाक्यावर कर्मचारी नागरिकास नाहक त्रास देऊन अरेरावीची भाषा वापरून दमदाटी करतात, व नियमबाह्य जादा रोख पैसे घेतात त्यावर योग्य ती कारवाई करावी,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर प्रदेश सरचिटणीस, ईश्वर क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, जिल्हाध्यक्ष अभिजित देडे, सोमनाथ कांबळे, संजय महापुरे, राजेंद्र गायकवाड, अमोल लोंढे, प्रवीण शिंदे, कृष्णा कुलकर्णी, गणेश माळी, जितेंद्र चव्हाण, राहुल कांबळे, विशाल क्षीरसागर, विशाल काळे, गणेश बोराडे, नितीन क्षीरसागर, खंडू क्षीरसागर, प्रवीण क्षीरसागर,प्रशांत कांबळे,आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा