चोरीचे गुन्ह्यातील आरोपीकडुन 2,25,000/-रु. किंमतीचे ट्रक चे इंजिनचे गिअर बॉक्स व इतर स्पेअर पार्ट हस्तगत....
*श्रीगोंदा पोलीसांची कारवाई*
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे की फिर्यादी विकास नानाभाऊ जगताप रा. ढोकराई ता. श्रीगोंदा यांचे अथर्व इंजिनेअरिंग नावाच्या दुकानातून 39,000/- रुपये किंमतीचे हायड्रोलिक मशिनचे स्केअर बार शेती अवजारे बनविण्याचे लोखंडी साहीत्य, लोखंडी खिडकी, लोखंडी पट्टया असे दि. 21/12/2021 रोजी रात्री चोरी गेले बाबत दिलेल्या फिर्यादी वरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 869/2021 भा.द.वि.क.379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा 1 ) उमेश गरड्या पवार वय रा. निमगाव खलु ता. श्रीगोंदा 2) दत्तु दिलीप पवार वय वर्षे, रा. श्रीगोंदा कारखाना ता. श्रीगोंदा यांनी केली आहे. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर संशयित इसमांची माहीती काढुन गुन्हा घडले ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपणीय बातमीदार नेमुन माहीती काढली असता वरील दोन्ही संशयित इसमांसोबत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने सदरचा गुन्हा केल्याबाबत खात्रीशिर माहीती मिळाली त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरील संशयित इसमांना दौंड येथुन ताब्यात घेतले व त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपींनी मढेवडगाव येथिल गॅरेज मधुन वाहनांचे सुट्टे भाग, ट्रकचे इंजिनचे सामान, काष्टी येथुन टायरचे लोखंडी डिस्क, इंजिन चे सामाने इत्यादी सुट्टे भागाची चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदरचे गुन्हे करताना आरोपींनी मारुती 800 कार तिचा आर.टी.ओ.नं.एम.एच.24 सी. 4786 ही वापरली असल्याची कबुली दिली त्यावरुन आरोपीचे घराची व मारुती 800 गाडी ची झडती घेतली असता त्याचे कब्जात चारचाकी वाहनांचे गाड्यांचे स्पेअर पार्ट, लोखंडी मटेरियल, गुन्ह्यात वापरलेली मारुती 800 कार असा एकुण 2,25,000/- रुपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांचेकडुन खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 1) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं.869/2021 भा.द.वि.क.379
2) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि.नं.880/2021 भा.द.वि.क.379 (3) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 883/2021 भा.द.वि.क.379
. अशाप्रकारे दाखल असलेले तिन गुन्हे उघड करण्यात आले असुन गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल व एक मारुती सुझुकी कंपनीची 800 गाडी असा एकुण 2,25,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आसुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रोहीदास झुंजार हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सपोनि दिलीप तेजनकर, सफौ अंकुश ढवळे, पोहेकॉ रोहीदास झुंजार, पोना गोकुळ इंगवले, पोकों प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके, पोकों अमोल कोतकर यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा