माढा मतदारसंघासाठीअर्थसंकल्पीय बजेट मध्ये 52 कोटी निधी मंजूर ... आ.बबनदादा शिंदे
........टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय व एकनाथ महाराज पालखीमार्गाचा समावेश.........
बेंबळे।प्रतीनिधी/aj24taas news Maharashtra
------------------------------_--------------------------------------------
बेंबळे, प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या चालू अर्थसंकल्पीय बजेट अधिवेशनामध्ये माढा विधानसभा मतदारसंघातील विविध कामासाठी 52 कोटी 23 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे. या विकास कामांमध्ये टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय व संत एकनाथ पालखी मार्ग तसेच माढा नगरपंचायती सहित इतर अन्य महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे
.
अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे माढा व करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामासाठी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये भरीव तरतूद झालेली आहे. यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी 15 कोटी रुपये ,दारफळ सीना येथील तलाठी कार्यालयासाठी 23 लाख रुपये, माढा नगरपंचायत साठी 3 कोटी रुपये, माढा- मालवंडी -वैराग रस्त्यासाठी 5 कोटी रुपये, माढास्टेशन रेल्वेगेट ते केवड रस्त्यासाठी 5 कोटी रुपये, मालवंडी -मानेगाव- नरखेड रस्त्यासाठी 5 कोटी रुपये तसेच जिल्हाहद्द ते मुंगशी- अरण- करकंब- पंढरपूर या संत एकनाथ महाराज पालखी मार्गासाठी 4 कोटी रुपये व कुर्डूवाडी- माढा- यावली ( हायब्रीड एम्युनिटी) कामासाठी 19 कोटी 65 लाख रुपये असे एकूण 56 लाख 88 हजार रुपये निधी मंजूर झालेला आहे. यातील कुर्डूवाडी -माढा- यावली (हायब्रीड एम्युनिटी) रस्त्याच्या कामासाठीचा काही भाग करमाळा मतदारसंघात येत आहे व या संपूर्ण कामासाठी 19 कोटी 65 लाख रुपये खर्च येणार आहे. यामुळे फक्त माढा विधानसभा मतदारसंघासाठी 52 कोटी 23 लाख रुपये नीधी अर्थसंकल्प बजेटमध्ये मंजूर झालेला आहे असे आमदार शिंदे यांनी आवर्जून सांगितले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा