पिलीव परीसरात जोरदार अवकाळी पाऊस ,तब्बल 42 मि मी पाऊसाची नोंद ,पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरात गुरुवारी रात्री एक वाजल्यापासून सकाळी अकरा वाजेपर्यंत जोरदार अवकाळी पाऊस झाला. पिलीव परीसरात तब्बल 42 मि मी एवढया पाऊसाची नोंद झाली. यामुळे काही भागात या पाऊसाचा शेतकऱ्यांना फायदा झाला तर बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनच्या ज्वारी, मका,हरभरा, गहू हया पिकाबरोरच द्राक्षाच्या बागांचे,डाळींब तसेच शेवगयाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच मका,कडवळ ही पिके कोलमडून पडली आहेत. मात्र हया पाऊसाचा सुळेवाडी,बचेरी, शिंगोणीँ हया भागातील शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे कारण हया दुष्काळी भागात यंदा पाऊसाळयात गेल्या वर्षी च्या तुलनेत पाऊस कमी झाला होता. यामुळे या पाऊसाने या भागातील पाणी पातळी त वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या पाऊसामुळे ओढे,नाले वाहु लागले आहेत. पण या पाऊसामुळे द्राक्ष व इतर बाग वाल्या शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. अजूनही अवकाळी पावसाची शक्यता आहे यामुळे गहू, हरभरा, तसेच इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांनमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. या अवकाळी पावसाचा ऊस तोडणीवर परीणाम झाला आहे. तसेच ऊस वाहतूक करणे अवघड झाले आहे. आज जर अजून अवकाळी पाऊस झाला तर उस तोड थांबवावी लागेल यामुळे कारखाने सुध्दा बंद करावे लागतील. या अवकाळी पावसाने ऊस तोड कामगारांचे मात्र मोठे हाल झाले आहेत. सलग आठ तास आणि तब्बल 42 मि मी एवढा पाऊस पिलीव परीसरात ऐन पावसाळ्यात सुध्दा झाला नव्हता. काही पिकांना हा पाऊस फायदेशीर तर काही पिकाचे मात्र नुकसान झाले आहे. फोटो - अवकाळी पावसामुळे पिलीव येथील भरत जामदार यांच्या ज्वारी च्या पिकाचे झालेले नुकसान.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा