Breaking

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

जिल्हा वार्षिक योजनेतून विविध कामांसाठी 64 लाखांचा निधी मंजूर - आमदार बबनदादा शिंदेपंढरपूर तालुक्यासाठी 44 लाख व माळशिरस तालुक्यासाठी 20 लाखांची तरतूद


जिल्हा वार्षिक योजनेतून विविध कामांसाठी 64 लाखांचा निधी मंजूर - आमदार बबनदादा शिंदे


पंढरपूर तालुक्यासाठी 44 लाख व माळशिरस तालुक्यासाठी 20 लाखांची तरतूद


माढा / प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक योजना सन 2021 - 22 मधून माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यासाठी 44 लाख व माळशिरस तालुक्यासाठी 20 लाख निधी विविध ठिकाणच्या रस्ता सुधारणा कामांसाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या 3054 - 2081 या लेखाशिर्ष अंतर्गत मंजूर निधीतून पंढरपूर तालुक्यातील शेवते ते खळगे वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी 32 लाख, नारायण चिंचोली ते कागदे वस्ती 12 लाखांची तरतूद केली आहे.माळशिरस तालुक्यातील वाघोली रस्ता ते गणपत भोसले वस्ती रस्ता सुधारण्यासाठी 10 लाख,वाघोली रस्ता ते मिसाळ-पाटील वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी 10 लाख निधीची तरतूद केली आहे.

या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी यानिमित्ताने पूर्ण होणार असून या भागातील लोकांची गैरसोय दूर होणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले आहे.

फोटो ओळी - आमदार बबनदादा शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा