विकासात्मक कार्याबरोबर गावचा समतोल राखणार - डॉ.प्रकाश पाटोळे
वडूज प्रतिनिधी - शरद कदम
तडवळे ता.खटाव येथे विकासात्मक कार्य करणार व गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून गावातील ग्रामस्थांमध्ये समतोल राखणार असल्याचे प्रतिपादन नूतन सरपंच व वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती डॉ. प्रकाश पाटोळे यांनी तडवळे ग्रामसभेत व्यक्त केले
यावेळी डॉ.पाटोळे पुढे म्हणाले की गावाने सरपंचपदाची माझ्या टाकलेली जबाबदारी ही गावामध्ये विविध विकास कामे, विविध शासकीय योजना राबवून पार पाडणार असून त्यासाठी सर्व ग्रामस्थांची सहकार्याची अपेक्षा आहे. शासन आपल्या दारी या योजनेतून प्रत्येक शासकीय योजनेचे असणारे फायदे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यालयातील अधिकारी यांची एक दिवस गावासाठी ही योजना राबवणार आहे. यावेळी सर्व शासकीय कामाचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करणार असून गावामध्ये दर्जेदार रस्ते, स्वच्छ पाणी, विज, आरोग्य तसेच गावामध्ये सांस्कृतिक भवन इत्यादी योजना राबवण्यासाठी मी ग्रामपंचायतीच्या वतीने कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी ग्रामसेवक एस.एच.सस्ते यांनी सचिव म्हणून काम पाहिले तर या ग्रामसभेस ग्रा.पं.सदस्य गणपतराव खाडे, बाळासाहेब पवार, मालन साबळे, अलकाताई पळे, रूपाली खाडे, माजी सरपंच काकासो साबळे, माजी उपसरपंच पी.डी. पाटोळे, युवा नेते अमोल साबळे, बाळासो खाडे गुरुजी, गोपीनाथ खाडे, शंकर पळे, पोलीस पाटील संदीप खाडे, प्रशांत राऊत, नितीन खाडे भाऊ, वालचंद साबळे, पांडुरंग खाडे, यशवंत पाटोळे, भीमराव साबळे, विजय पळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावातील विकासात्मक विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच रोजगार हमी योजनेचे महत्व व योजनेचे स्वरूप तसेच घरकुल पात्र लाभार्थी यादी वाचन करण्यात आले. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना इत्यादींची माहिती या ग्रामसभेत देण्यात आली उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार अमोल साबळे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा