Breaking

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

राजकुमार सरडे यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान*


*राजकुमार सरडे यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान*

टेंभुर्णी/प्रतिनिधी-
 गौरव महाराष्ट्राचा आनंद उत्सवाचा कार्यक्रमांमध्ये कोल्हापूर लाईव्ह सुपरफास्ट न्यूज व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये आदर्श समाज रत्न पुरस्काराने कंदर ता. करमाळा येथील रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे यांना  सामाजिक क्षेत्रातील उत्तम कार्याबद्दल , गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे दिनांक 12/12/21 रोजी नुकताच विनयरावजी कोरे जनसुराज्य शक्ती अध्यक्ष, विद्यमान आमदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत थोरात , राजेश  क्षीरसागर,कार्यकारी मंडळ,  महाराष्ट्र राज्य,राहूल पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष कोल्हापूर,प्रमोद सुर्वे सा.पो.निरीक्षक   विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा