दवाखान्यात गेलेली विवाहित महिला बेपत्ता झाल्याने पांगारी परिसरात खळबळ
महाड – प्रतिनिधी
महाड तालुक्यातील पांगारी गावातील अपेक्षा प्रतिक मोरे हि विवाहित महिला दवाखान्यात जाते असून सांगून घराबाहेर पडली मात्र सदर महिला घरी परत न आल्याने महाड तालुका पोलीस ठाण्यात या महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.
महाड तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ८ डिसेंबर रोजी पांगारी गावातील अपेक्षा प्रतिक मोरे वय २६ हि डॉक्टरांकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेने आकाशी रंगाची साडी, उंच काळ्या रंगाची चप्पल, परिधान केली आहे. याबाबत अधिक तपास महाड तालुका पोलीस करत आहेत. सदर महिलेची माहिती प्राप्त झाल्यास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक टी.डी.लोळे यांच्याकडे ०२१४५ – २२२२५४, ८५५४०८६१२५ वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा