वीज वितरणच्या ट्रान्सफार्मर मधून 36 हजारांची तांब्याच्या तारेची चोरी करून अज्ञानी व्यक्तीवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यातील रायगड विभागातील पुनाडेवाडी या गावातून वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर मधून ६० किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना २२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या दरम्यान घडली. महाड तालुका पोलीस ठाण्यात १६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे कर्मचारी अनिल शंकर साबळे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार महाड तालुक्यातील रायगड किल्ल्या जवळील पुनाडेवाडी या गावातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा मालकीच्या ट्रान्सफार्मरमधून अज्ञात चोरट्यांनी फोडून त्या मधून ६० किलो तांब्याची तार चोरून नेली. या तारेची अंदाजे किंमत जवळ पास ३६००० हजार एवढी आहे. ही घटना २२ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान घडली असल्याचे या तक्रारी मध्ये म्हटले असून गुरुवारी महाड तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात भादवी कलम ३७९ / ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा