शिराळा चे विलास लोकरे यांचे निधन....
बेंबळे ।प्रतिनिधी। .... फोटो
वृत्तांत असा की शिराळ (टे )तालुका माढा येथील प्रतिष्ठित बागायतदार विलास सिताराम लोकरे यांचे गुरुवार दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले, ते ६१ वर्षाचे होते. त्यांचे पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय अध्यात्मिक कार्यात विलास भाई लोकरे यांचे मोलाचे योगदान होते. शिराळ( टे )विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सिताराम लोकरे यांचे ते सुपुत्र आहेत ,त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा