सुपे (बारामती) परिसरातील अवैध दारूधंदे बंद करा युवा सामाजिक कार्यकर्ते व महिला बचत गटाची मागणी
सुपे प्रतिनिधी/सागर चांदगुडे बारामती
सुपे: बारामती तालुक्यातील सुपे येथील सुरू असलेली दारू बंद करण्याची मागणी युव सामाजिक कार्यकर्ते व महिला बचत गट यांनी केलेली दरम्यान मुख्यमंत्री /उपमुख्यमंत्री ,गृहमंत्री महिला आयोग ,जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस कार्यालय व वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे आदी ठिकाणी लेखी निवेदनाद्वारे अवैध दारूधंदे बंद करण्याची मागणी केली सुपे येथील अनेक दिवसापासून बेकायदेशीर दारू चालू आहेत आंबेडकर नगर ,लहुजी वस्ताद नगर ,इंदिरा नगर, लोणकर मळा ,कुसेगाव घाटाच्या वरती, नगरेमळ्या शेजारी व पूजा गार्डन समोर तसेच पोलीस स्टेशन च्या शेजारी शेजारी तसेच सात ते आठ ठिकाणी अवैध दारू धंदे सुरू आहेत अशी माहिती युवा सामाजिक कार्यकर्ते, प्रगती महिला, सावित्रीबाई फुले महिला, तुळजाभवानी महिला, रमाई महिला अधी बचत गटांनी माहिती दिली. मात्र हे धंदे सुरू असल्याने येथील गरीब महिलांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा गरीब कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे अवैध दारु धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी मी राजे प्रतिष्ठान बारामती तालुक्यात संपर्क प्रमुख यांनी हि मागणी केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा