बेंबळे येथे शनिवारपासून आट्यापाट्याच्या भव्य सामन्यांचे आयोजन....
......साठ हजार रुपयांच्या बक्षिसांची खैरात....
बेंबळे ।प्रतिनिधी
बेंबळे येथील श्री विमलेश्वर कला, क्रीडा व संस्कृतीक मंडळाच्या वतीने येत्या शनिवार दिनांक 11 डिसेंबर पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आट्यापाट्या खेळाच्या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघास २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ११ हजार रुपये तर चौथ्या एणार्या क्रमांकास ७ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याचप्रमाणे सामन्याच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणार्या चार संघाना प्रत्येकी एक हजार रुपये, तर सर्वोत्कृष्ट खेळाडूस १५०० रुपये बक्षीस दिले जाणार असून एकूण ६० हजार रुपये रकमेच्या बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे.
या सामन्याचे समालोचक व विश्लेषक म्हणून बापू लोकरे व अडसूळसर ( सांगवीकर) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सामन्यांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघास ३०० रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. सामने रात्रंदिवस खेळविण्यात येणार असल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंच्या राहण्याची व जेवणाची होय मंडळाच्यावतीने करण्यात आलेली आहे. सामन्यांमध्ये प्रत्येक संघातील एकच खेळाडू दोन वेळा खेळू शकणार असून सामने चालू असताना पंचांचा निर्णय अंतिम राहील असे संयोजकांच्या वतीने स्पष्ट कळविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा