Breaking

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड एक अटक तीन फरार


जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड एक अटक तीन फरार

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील कुंबळे गावात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले असून तीन जण फरार झाले आहेत. हि घटना गुरुवारी १६/१२/२०२१ रोजी संध्याकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. महाड तालुका पोलिसांनी मुद्देमाला सोबत एक विक्रम रिक्षा देखील जप्त केली आहे.

महाड तालुक्यातील कुंबळे या गावात शरद काशीनाथ साळवी रा. कुंबळे बौद्धवाडी यांच्या घरामध्ये तीन पत्ती नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती महाड तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी ६:१५ वाजता महाड तालुका पोलिसांनी या घरावर धाड टाकली. यावेळी जुगार खेळत असताना चार जण सापडली. घर मालक शरद साळवी याला पोलिसांनी ताब्यात घेतले तर विजय शांताराम मनवे - जुई, जहीर हुसैन चिमावकर - कुंबळे, आणि अख्तर -तुडील असे तीन जण पळून गेले. घटनास्थळी एक लाख किमतीची विक्रम रिक्षा, ३९०० रोख रक्कम, ५००० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ५०० रुपये किमतीचा पत्त्यांचा जोड व इतर छोटी रक्कम मिळून १,०९,४०८ एवढ्या रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीं विरोधात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा