Breaking

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बेंगलोर येथील स्मारकाची विटंबना करणाऱ्या कानडी गुंडांचा तीव्र निषेध.



तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बेंगलोर येथील स्मारकाची विटंबना करणाऱ्या कानडी गुंडांचा तीव्र निषेध.



अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बेंगलोर येथील स्मारकाची विटंबना करणाऱ्या कानडी गुंडांचा तीव्र निषेध. हा प्रकार अत्यंत संतापजनक व वेदनादायी आहे. व कर्नाटक चे मुख्यमंत्री यांनी ही झालेली घटना क्षुल्लक आहे असे वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अवमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. आमच्या प्रेरणास्थानावर, आमच्या अस्मितेवर हल्ला करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे या व समाज कंटकवार कार्यवाही, कर्नाटक मुख्यमंत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी  मागणी चे तहसीलदार श्री तांदळे साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापूर यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,विधानसभा अध्यक्ष गोकुळतात्या शिंदे,शहराध्यक्ष अमर चोपदार, सचिव अभय माने, युवक तालूकाध्यक्ष संदीप गंगणे,युवक शहर अध्यक्ष नितीन रोचकरी, व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार,खंडू जाधव, गणेश नन्नवरे,युवक नेते अक्षयभैय्या परमेश्वर आदींनी निवेदन दिले.

**********Advt*******

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा