Breaking

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

डॉ.कैलास कोल्हे यांचा सत्कार



डॉ.कैलास कोल्हे यांचा सत्कार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड: नांदेड मधील रुग्णांना आता पोटविकारासाठी हैद्राबाद,मुबंई किंवा इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही.आता रुग्णांच्या सेवेसाठी नांदेड जिल्ह्यात भूमिपुत्र डॉ.कैलास कोल्हे  (MBBS,MD,DM,fellowship in molecular hepatology) हे नांदेड येथील नारायना हॉस्पिटल येथे रुजू झाले आहेत.

डॉ.कैलास कोल्हे हे नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्र असून अतिशय सर्व सामान्य परिस्थितून त्यांनी आपले शालेय शिक्षण सिडको,नांदेड व वैद्यकीय शिक्षण मिरज,अमृतसर,मुंबई येथून पूर्ण केल्यानंतर LTMMC & GENERAL HOSPITAL SION MUMBAI येथे रुग्णसेवा दिली.पण आपल्या जन्मभूमितील रुग्णांना अत्याधुनिक पोटविकार सुविधेसाठी धावपळ करत मुंबई किंवा इतरत्र फिरावे लागते,म्हणून डॉ.कैलास कोल्हे हे नांदेड येथील नारायणा हॉस्पिटल येथे १ डिसेंबर पासून रुजू झाले आहेत.त्यामुळे नांदेड व मराठवाड्यातील रुग्णांना याचा खूप फायदा होणार आहे.त्यांच्या या रुग्ण सेवे बद्दल सर्व स्थरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

डॉ.कैलास कोल्हे यांचे बालपणीचे जिवलग मित्र अनिल पाटील उमरेकर, दीपक पाटील मोरे यांनी त्यांचा सत्कार करून रुग्णसेवेच्या महान कार्यात सदैव यश मिळो आशा शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा