Breaking

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

भैरवनाथ शुगर आलेगाव कारखान्याचा पहिला हप्ता 2100 रुपये जाहीर*


*भैरवनाथ शुगर आलेगाव कारखान्याचा पहिला हप्ता 2100 रुपये जाहीर--प्रा. शिवाजी सावंत


माढा तालुका  प्रतिनिधी / भारत जगताप 
AJ 24Taas News Maharastra


भैरवनाथ शुगर आलेगाव युनिट नंबर 4 या कारखान्यांनी सीजन 2021-22 गळीत हंगामामध्ये येणाऱ्या उसास पहिली उचल  शेतकऱ्यांच्या खात्यावर 2100 रुपये जमा केली असून भैरवनाथ शुगर आलेगाव युनिट नंबर 4 हा कारखाना आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे 
चेअरमन शिवाजीराव सावंत सर यांनी गाळप हंगाम 2021-22 मध्ये ऊस पुरवठा करणारे शेतकरी यांचे ऊस दर व ऊस वाहतूक ठेकेदार यांचे दरवाढीबाबत पत्र काढून घोषित केले आहे
गाळप हंगाम 2021-22 मध्ये भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्याकडे ऊस पुरवठा करणारे शेतकरी यांच्या उसास रुपये 2400 प्रति मे.टन देणार असल्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी पत्र काढून घोषित केले आहे यापैकी पहिला ॲडव्हान्स हप्ता 2100 रुपये प्रति मे टन पंधरवाडा वाईस देण्यात येणार असून उर्वरित बिलाची रक्कम दोन हप्त्यात देणार आहोत असे जाहीर करण्यात आले 
भैरवनाथ शुगर आलेगाव या  कारखान्याकडे सीजन 2021- 22 मध्ये ऊस वाहतुक  करणाऱ्या वाहतूकदार यांना  12.५0 टक्के वाढ करण्यात आलेली आहे 
मागील हंगामा मधील सीजन 2020 -2021 मधील आलेल्या उसास 100 रुपयेप्रमाणे  दीपावली सणासाठी शेतकऱ्यांना हप्ता वाटप केला आहे व वाहतूक तोडणी कमिशन  डिपॉझिट ही अदा केले आहे असे चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी सांगितले

चालू हंगामात जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा ऊस देऊन सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आव्हान कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत सर कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत व कारखान्याचे असिस्टंट जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा