Breaking

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड धडा शिकवणार- अमित घोगरे*




*छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड धडा शिकवणार- अमित घोगरे*


*AJ 24 Taas news Maharashtra-करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*


    छत्रपती शिवराय हे अखंड विश्वाचे प्रेरणास्थान असून काही कट्टरपंथी संघटना जाणीवपूर्वक त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असून अशा शिवद्रोह्यांना संभाजी ब्रिगेड धडा शिकवेल असा इशारा  संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे यांनी दिला.
     यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,सचिव सचिन शिंदे,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ,जिल्हा संघटक गणेश सव्वाशे, तालुका सचिव गणेश डोके,कार्याध्यक्ष राजेश ननवरे, विशाल पाटील,हनुमंत घोरपडे, करमाळा शहराध्यक्ष वैभव माने,जालिंदर माने,दत्तात्रय अरणे, अजित कांडेकर, आनंद इंदलकर, दत्ता नलवडे आदींसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
       बेंगलोर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संभाजी ब्रिगेड नेहमीच महापुरुषांच्या  सन्मानार्थ अग्रेसर राहिली आहे.काही जातीयवादी संघटना जाणीवपूर्वक छत्रपती शिवराय तसेच अन्य महापुरुषांच्या स्मारकाचा अवमान करून जातीय तेढ निर्माण करत असून राजकीय लाभासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा