पिलीव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सौ अनिता अविनाश जेऊरकर विजयी
पिलीव प्रतिनिधी - AJ 24 Taas news Maharashtra Network
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील वॉर्ड क्रमांक दोन ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी जहागीरदार पार्टीच्या उमेदवार सौ अनिता अविनाश जेऊरकर या १२२ मतांनी विजयी झाल्या आहेत .
या पोटनिवणुकीसाठी जहागीरदार पार्टीच्या वतीने सौ अनिता अविनाश जेऊरकर तर विरोधी गटातून सौ ज्योती सचिन भैस यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.या वॉर्डमधील मतदान दिनांक २१ डिसेंबर रोजी पार पडली या एकूण मतदान १००२ असून या वेळी एकूण 717 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सौ अनिता अविनाश जेऊरकर यांना 416 मते पडली तर ज्योती भैस यांना 294 मते तर 7 मते नोटा ला आहेत. सौ अनिता अविनाश जेऊरकर यांनी १२२ मतांनी विजयाची बाजी मारली आहे.
यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
पार्टी प्रमुख ,माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार व सर्व कार्यकर्त्यांनी पार्टीच्या वतीने सौ अनिता अविनाश जेऊरकर यांचा सत्कार केला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा