Breaking

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

लोकनेते स्व.संतोष खेतमाळीस यांच्या स्मरणार्थ मोफत लाळ- खुरकुत लसीकरण/मार्गदर्शन-पशु सेवक राजू तरटे


लोकनेते स्व.संतोष खेतमाळीस यांच्या स्मरणार्थ मोफत लाळ- खुरकुत लसीकरण/मार्गदर्शन-पशु सेवक राजू तरटे


श्रीगोंदा-नितीन रोही,

तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये लाळ खुरकुतची साथ पशुपालनावर आलेली आहे, त्यामुळे शेतकरी/पशुपालक भयभीत झाल्याचे दिसून येत आहेत.हा आजार पशुंसाठी खुप भयंकर असून पशुपालकांनी दक्षता /काळजी घेणे गरजेचे आहे. 
मंगळवार दि. ७/१२/२०२१या तारीखेचे औचित्य साधत पशुसेवक तरटे राजू यांनी पशुमधील सर्वात महत्त्वाचे लाल खुरकुत लकीकरण शेतकरी बंधुनच्या घरी जाऊन गाई,मैस,बैल,शेळी आश्या मुक्या प्रान्यांना मोफत लसीकरण करत असून मार्गदर्शन करत आहेत, लालखुरकुत आल्यानंतर नुकसान अतिनुकसान कसे कमी करता येईल या विषयी अनुभवी मार्गदर्शन करत आहेत.

या महत्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्ष स्व.संतोष खेतमाळीस यांच्या पशुपालनापासुन केली. यावेळी स्व.संतोष खेतमाळीस यांच्या स्मृतीना तरटे यांनी उजाळा दिला.

लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणाचे महत्व समजावुन कार्याला सुरवात केली. संतोषजीच्या स्मरणार्थ-दरवर्षी हा उपक्रम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
 ते स्वतः वार्ड नंबर २मधील पशुंना लसीकरण करत आहेत.पशुपालकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हानहन नगरसेविका सुनिता संतोष खेतमाळीस यांनी केले आहे.

 स्व खर्चाने लस खरेदी करून मोफत लेशीकरण करत असल्याने त्यांचे
जेष्ठ आमदार बबनदादा पाचपुते,जन शक्ति संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे, राष्ट्र्वादीचे प्रदेश उपाअध्यक्ष घनश्याम शेलार,नागवडे कारखान्याचे चेरमन राजेंद्र नागवडे,जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, मार्केट कमेटी चे बाळासाहेब नाहाटा,गट नेते मनोहर पोटे,जेष्ठ नेते पोपट खेतमाळीस,संजय खेतमाळीस,मा-नगरसेवक दादासाहेब औटी,प्रदीप औटी,मा-उप नगरध्यक्ष रमेश लाढाणे, व्हा-चेरमन सुदाम दांडेकर,सुरेश आळेकर,पोपट आळेकर(हॉटेल नंदनवन),भानुदास राऊत,गनीशे,ढवाण,शेडगे,गाड़े, कुदळे, मेहेत्रे, वांगने,हिरडें यांच्या सह मित्र परिवार, नातेवाईक,विविध पक्षातील संघटनेतील नेत्यांनी पशुसेवक तरटे यांचे अभिनंदन करीत कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा