Breaking

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात एक जनाचा मृत्यू तर ११ जन जखमी,तुळजापूर नजीक घटना*



*सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात एक जनाचा मृत्यू तर ११ जन जखमी,तुळजापूर नजीक घटना*


तुळजापूर : राष्ट्रीय महामार्गवर उस्मानाबाद सोलापूर महामार्गा वर बार्शी रोड पुलावर दि.१० डिसेंबर रोजी क्लोजर ला अज्ञात वाहनाने धडक देऊन भिषण अपघात झाला.

रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला .या अपघातामध्ये एक जण मयत तर अकरा जण जखमी

अधिक माहिती अशी कि,उस्मानाबाद - सोलापूर महामार्गावर तुळ जाफर घाट पायत्याशी पुलावर हा अपघात झाला आहे .जालना वरून पंढरपूर कडे दर्शनासाठी जाणारी क्लोजर क्रमांक MH.31.V.3281 ही पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे 

श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी वळत असताना अज्ञात वाहनाने पाठीमागून क्लोजर ला जोराची धडक दिली . या अपघातात एक जण जागीच मृत्यू झाले .तर क्लोजर्स गाडीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .या अपघातामध्ये शेवगाव जि.जालना येथील 11 युवक तरुण आहेत तर घनसांगवी जि,.जालना येथील एक तरुण आहे असे एकूण बारा जण अपघातामध्ये होते .या अपघातात मध्ये मयत
विठ्ठल रामराव वारडकर वय 31वर्ष,हे मयत झाले असून जखमींमध्ये वैभव नारायण धुमाळ 21वर्ष,प्रल्हाद गणेश वारडकर वय 16 वर्ष,रमेश यावले 24 वर्ष ,गार्वधन धुमाळ 24वर्ष ,,
मंगेश धुमाळ 21वर्ष ,रोहित धुमाळ 21 वर्ष,योशिश धुमाळ 21,वर्ष केशव उगले 23वर्ष ,महेश धुमाळ 25वर्ष, रामेश्वर परमेश्वर धुमाळ 31 वर्ष ,हे सर्व रा.शेवगाव ता.परतुर जि.जालना तर क्लोजर चालक दगुड काकडे 25मु पो काकडे कादेर तालुक घनसांगवी, जिल्हा जालना,असे जखमींची नावे आहेत .सदर घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक विकास माळी,पोलीस ज्ञानेश्वर माळी,पोलीस सनी शिंदे,ए एस आय चालक रवी शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत कार्य सुरू केले .पुढील उपचारासाठी जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथून जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे हलविण्यात आले आहे .


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा