*स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद, यांच्या अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर,लोहारा,व उमरगा या तालुक्यातील २२५ महिलांचे सक्षमीकरण*
स्वयंम शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर लोहारा व उमरगा या तालुक्यातील २२५, महिलांचे सक्षमीकरण , व्यवसायिकता, सखी अन्न सुरक्षा शेती, भाजीपाला व्यवसाय , लसीकरण,मार्केटिंग इत्यादी विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. सुरवातीस संस्थेची ओळख तसेच संस्थेमध्ये चालणार्या वेगवेगळ्या कार्यक्रमाविषयी माहिती संस्थेच्या प्रोग्राम मॅनेजर मोमिन तबसुम यांनी दिली,तसेच एअरटेल मॅनेजर रवि कोले , रोहित हुडे यांनी एअरटेल बॅंक विषयी मार्गदर्शन केले.तसेच शरयु कुलकर्णी यांनी भाजीपाला व्यवसाय चे मार्गदर्शन केले.लक्ष्मी दुध संकलन केंद्राविषयी प्रमोथीन चे अविनाश भगत यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राणी शिराळ यांनी केले,हा कार्यक्रम उत्कृष्टरीत्या पार पाडण्यासाठी शितल रणखांब,अंजना साबळे , सुजाता पाटील, रोहिणी घोडके ,शिल्पा वलदोडे,शाहिदा मुजावर यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा