Breaking

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

माढा तालुका केमिष्ट व ड्गिष्ट असोशिएशनची सभा उत्साहात संपन्न अध्यक्ष पदी राहूल काळे तर सचिवपदी गुरूनाथ सांगडे


माढा तालुका केमिष्ट व ड्गिष्ट असोशिएशनची सभा उत्साहात संपन्न  अध्यक्ष पदी राहूल काळे तर सचिवपदी गुरूनाथ सांगडे             

 
  कन्हेरगांव  प्रतिनिधी ः   रविवारी  टेंभुर्णी येथे माढा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी माढा तालुक्याच्या अध्यक्षपदी राहूल काळे(टेंभुर्णी )तर सचिवपदी गुरूनाथ सांगडे (माढा) यांची निवड करण्यात आली. यावेळी  वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बदलत्या काळानुसार केमिस्ट यांच्या व्यवसायामध्ये होणाऱ्या बदला बाबत सविस्तर चर्चा सत्र जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. बँक ऑफ इंडिया च्या वतीने केमिस्ट व्यवसायाला लागणार्‍या सुलभ कर्जाबाबत अधिकारी श्रीयुत बोबडे साहेबांकडून सविस्तर मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याच प्रमाणे औषध व्यवसायाला लागणारे सॉफ्टवेअर पुणे येथील प्रसिद्ध कंपनी दवा इन्फोटेक यांचेकडून केमिस्ट बांधवांच्या अडचणींविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून अनेक विषयांवर मार्गदर्शन लाभले. विशेष करून  महाराष्ट्र राज्य पश्चिम विभाग संघटनेचे मानद सचिव व सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री बसवराज मणुरे यांनी स्पर्धेच्या युगात या व्यवसायात कशा प्रमाणे आमूलाग्र बदल करणे अपेक्षित आहे याबाबत सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले.माढा तालुक्यातील उपस्थित असलेल्या २00 पेक्षा जास्त सभासदांनी टाळ्यांच्या गजरात नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड केली. माढा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची यादी खालील प्रमाणे

 श्री. राहुल काळे (अध्यक्ष) 

श्री गुरुदास सांगडे- (सचिव) 
श्री परेश कोठारी -(खजिनदार)
 श्री मिलिंद कराडे- (उपाध्यक्ष) 
श्री वैभव नांगरे- (संघटक सचिव) 
श्री हर्षवर्धन दोशी -(सहसचिव) 
या व्यतिरिक्त तीन ग्रामीण सदस्यांची ही निवड एकमताने करण्यात आली यामध्ये टेंभुर्णी परिसरातील ग्रामीण सदस्य म्हणून श्री प्रशांत ननावरे,
कुर्डुवाडी ग्रामीण सदस्य म्हणून श्री प्रमोद सुर्वे, 
माढा ग्रामीण सदस्य श्री औदुंबर राऊत 
यांची निवड करण्यात आली. यानंतर नुतन अध्यक्ष श्री राहुल काळे यांनी संघटनेच्या   सभासदांना अपेक्षित असलेले कार्य येत्या तीन वर्षात चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि त्याला सर्व नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी एकमताने पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमासाठी श्री गंगाधर आप्पा कापसे ,श्री बसवराज मणुरे, श्री राजशेखर बारोळे ,श्री राजेश विरपे ,श्री शेखर नेने ,श्री सिद्धेश्वर घाळे ,श्री प्रशांत खलीपे ,श्री सुधीर आबा राऊत , श्री अभिजीत गाढवे, माढा तालुका चे मावळते अध्यक्ष श्री संजय बापू भांगे  सह जिल्हा पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी टेंभुर्णी शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री संजय तोडकर सचिव श्री प्रवीण पाटील,महादेव सपाटे,विपुल ञिवेदी,निलेश ताटे,धिरज कथले,अतुल डोके,भालचंद्र पाटिल,अमर डोके,किशोर मोरे,गणेश ढवळे,चेतन ढवळे उमेश मिस्किन व शहराचे सभासद यांचे बहुमोल सहकार्य लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा