Breaking

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदन पत्र वेळेत भरावी* - श्री. मारुती फडके, गटशिक्षणाधिकारी




*शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदन पत्र वेळेत भरावी* - श्री. मारुती फडके, गटशिक्षणाधिकारी


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे या परीक्षेसाठी शासनमान्य शाळांमधून सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये प्रविष्ट होण्यासाठी  अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेत स्थळावर दि.१.१२. २०२१ रोजी पासून ते ३०.१२.२०२१ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहेत सदर परीक्षा दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी माढा तालुक्यातील सर्व शाळेमधील पात्र विद्यार्थ्यांची 100% आवेदन पत्र वेळेत भरून घेण्यात यावीत असे आवाहन  गटशिक्षणाधिकारी श्री मारुती फडके,विस्तार अधिकारी श्री. बंडू शिंदे,डॉ.श्री. विलास काळे आणि शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख श्री. महादेव सोनवणे यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा