Breaking

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

प्रथम वर्ष बी फार्मसीच्या प्रवेशासाठी प्रथम फेरी ४ डिसेंबर पासून सुरु


प्रथम वर्ष बी  फार्मसीच्या प्रवेशासाठी प्रथम फेरी ४ डिसेंबर पासून  सुरु 


शैक्षणिक वर्ष २०२१-२२ प्रथम वर्ष बी फार्मसीसाठी प्रवेश प्रक्रियेची प्रथम फेरी शनिवार दिनांक ०४ डिसेंबर २०२१ पासून सुरु होणार असून  ती  सोमवार  दिनांक ०६ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये  ऑनलाईन कॅप राऊंडसाठी ऑपशन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच बी फार्मसी प्रवेशाची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर बुधवार  दिनांक ०८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती श्री गणपती फार्मसी संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे व प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी दिली. 

२०२१-२२ च्या पदवी फार्मसी अर्थात बी फार्मसी प्रवेशा करिता यापूर्वी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्वीकारून कागदपत्रांची पडताळणी करणे या सर्व प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर  आता येत्या शनिवार ०४ डिसेंबर पासून ते सोमवार ०६ डिसेंबर पर्यंत उमेदवाराला योग्य महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे. 
ऑनलाईन  रजिस्ट्रेशन   केलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीचा लाभ घेता येणार आहे. पहिल्या फेरीसाठी जागावाटप बुधवार दिनांक ०८ डिसेंबर रोजी प्रदर्शित केले जाईल. या पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती गुरूवार दिनांक ०९ डिसेंबर ते शनिवार दिनांक ११ डिसेंबर दुपारी ०३ वाजेपर्यंत करता येईल व त्यानंतर जागा वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून प्रवेशाची निश्चिती करण्याची मुदत गुरूवार ०९ डिसेंबर ते शनिवार ११ डिसेंबर सायंकाळी ०५ वाजेपर्यंत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा