Breaking

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणार - धनंजय मोरे .



शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणार - धनंजय मोरे .

टेंभुर्णी/ दि प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणार असून , समाजातील सर्व स्तरातील गोरगरीब मुलांसाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे , त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे , प्रतिपादन माढा तालुका शिक्षण सल्लागार समितीचे सदस्य धनंजय मोरे यांनी केले .
            कन्हेरगांव तालुका माढा येथे मंगळवारी 14 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दशरथ चव्हाण होते .
       कन्हेरगांव तालुका माढा येथे माढा तालुका शिक्षण सल्लागार समितीच्या शासन नियुक्त सदस्य पदी धनंजय मोरे यांची निवड झाल्याबद्दल तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आनंदराव मारुती गोडसे यांना मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .
          यावेळी सरपंच दशरथ चव्हाण ,  ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भरगंडे , केंद्रप्रमुख  मनोज पवार , आदर्श शिक्षक पुरस्कार आनंदराव गोडसे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  संजय डोके पाटील ,  राजेंद्र केदार , रतिलाल केदार  , ज्योतीराम भरगंडे , मुख्याध्यापक किशोरकुमार बगाडे, प्रमोद शिंदे ,   शिवदास कुबेर , इंदुमती कुबेर , सविता शिंदे , शिवकन्या खोचरे आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रप्रमुख मनोज पवार , आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आनंद गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले . आभार प्रमोद शिंदे यांनी मानले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा