*तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे शांतलिंगेश्वर मठात पुराण समाप्ती*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
शांतलिगेश्वर विरक्त मठ नंदगाव येथे मागील एकवीस दिवसापासून सुरू असलेले शांत लिंगेश्वर यांच्या जीवन चरित्रावरती प्रवचन पुराण व मठाच्या जिर्णोद्धाराचा कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगता समारंभ झाला त्यानिमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष सौअस्मिता ताई कांबळे व पंचायत समिती सभापती सौ रेणुका ताई इंगोले पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समाप्तीचा सोहळा पार पडला यानिमित्ताने अध्यक्ष सौ अस्मिता ताई कांबळे यांच्याशी नंतर विविध विषयावरती चर्चा करून प्रलंबित असलेल्या कामाचा पाठपुरावा केला व तातडीने या कामाचे पूर्तता करावी असे ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी युवा नेते वैभव पाटील सागर चौगुले संजय पाटील सुरज गुड्डे मल्लिनाथ गुड्डे ईरण्णा वाले अप्पू करंडे रहीम शेख अप्पु गबूरे सचिन कोरे गणेश कामशेट्टी सचिन कर्पे शरद पोद्दार नंदकुमार पोद्दार मल्लिनाथ चिनगुंडे कल्याणी कोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा