*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
प्रतिनिधी/ रूपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर:-येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात देशाचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयात बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी,आई तुळजाभवानी यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे ,सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे,क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विलास राठोड,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर,डॉ. श्रीरंग लोखंडे, डॉ.बृहस्पती वाघमारे, डॉ. एम. जी.देशमुख, डॉ.जोतीबा राजकोंडा,डॉ. शशिकला भालकरे,प्रा. रत्नाकर उपासे,प्रा. जी. व्ही. पाटील,प्रा. कुमार खेंदाड,प्रा. अमर भरगंडे,प्रा. अमोद जोशी,कृष्णा कोळी, जनार्धन पाटील,आप्पा जाधव यांची उपस्थिती होती या वेळी सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा