माढा आणि करमाळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी हप्ता न घेता विकासकामे करतात - आमदार बबनराव शिंदे.
निमगांव टें येथे विविध विकास कामांचा शुभारंभ.
AJ 24 Taas News Maharastra/कन्हेरगांव प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
सरपंच यशवंत भैय्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गावात कामं दर्जेदार झाली असून , दोन एकर क्षेत्रावर नाना- नानी पार्क करण्यात येणार आहे ,
ग्रामसचिवालय , ओपन जिम लवकरच होईल , टप्याटप्याने नवीन कामे होणार असून , गावाला जोडणारे चारही बाजूंचे सर्व रस्ते डांबरीकरण करणार असून , माढा आणि करमाळा तालुक्यातील आमदार हप्ता न घेता विकासकामे करत आहेत , गाव आदर्श निर्माण करण्यासाठी गावात शिस्त महत्त्वाची आहे , ५० वर्षांत गावात एकही निवडणूक झाली नाही , असे प्रतिपादन आमदार बबनराव शिंदे यांनी केले.
निमगांव टें तालुका माढा येथे २६ जानेवारी रोजी कचरा व्यवस्थापन घंटागाडी व १ कोटी २५ लाख रुपयांची विविध विकासकामांच्या लोकार्पण, उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजयमामा शिंदे होते.
यावेळी बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की , निमगांव ने जिल्ह्याचे , तालुक्याचे नेतृत्व केले आहे .लोकाचा सहभाग महत्त्वाचा असतो , कामं चांगल्या पद्धतीने करा, गावानं दोन आमदार दिले असून राज्यात निमगांव चे नाव एक नंबर ने पुढे आणण्यासाठी, सर्वांनी मिळून काम करावे , असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी आमदार बबनराव शिंदे , आमदार संजयमामा शिंदे , जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे , सभापती विक्रमसिंह शिंदे , निमगांव टें चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे , माजी सरपंच रविंद्र शिंदे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवाजी थोरात , आरोग्य अधिकारी तुकाराम पायगण , शशिकांत शिंदे , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे , मंडल अधिकारी सूर्यकांत डिकोळे , बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नाईकवाडी , बाल विकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव , ग्रामसेवक रामभाऊ मिटकल , पोपट खापरे , तलाठी सहदेव काळे , शाखा अभियंता राहुल डेंगळे , लक्ष्मण मोगल , नीलेश मुरकुटे , सतीश भंडारे , प्रवीण शिंदे गुरुजी, बापूसाहेब शिंदे, प्रमोद बोबडे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे म्हणाले की , नवीन संकल्पना , नवीन उपक्रम सरपंच यशवंत शिंदे यांनी गावात राबविले असून घनकचरा संकल्पना यांसह विविध उपक्रम केल्याने त्यांनी कौतुक करत , वाड्यावस्त्यांवर चे रस्ते सिमेंट कॉंक्रीट चे करणार असल्याचे सांगून , राज्यात आगळं वेगळं गाव होण्यासाठी यशवंत शिंदे यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन रणजीतसिंह शिंदे यांनी केले .
सरपंच यशवंत भैय्या शिंदे म्हणाले की , ६५ लाखांचा निधी फक्त स्वच्छतेसाठी वापरला आहे . गावातील प्रत्येक युवकांना एकत्रित करून गावामध्ये पारदर्शक कारभार करत असुन विकास कामांच्या नफ्यातून राहिलेले पैसे परत गावच्या विकासासाठी वापरणार आहे .
यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे , सोमनाथ शिंदे , अश्विनी गरड , आरोग्य अधिकारी तुकाराम पायगण , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवाजी थोरात यांनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक ग्रामसेवक रामभाऊ मिटकल यांनी केले ..
कार्यक्रमासाठी उपसरपंच सुनील येळे , ग्रामपंचायत सदस्य सुनील खापरे , युवराज शिंदे , जनसंपर्क अधिकारी प्रदीप पाटील , सदस्य प्रताप शिंदे , सदस्य सुनील शिंदे , मामासाहेब शिंदे , सोमनाथ शिंदे , बाळासाहेब शिंदे , सचिन शिंदे , संतोष देशमुख , सदस्य उदय शिंदे , बालाजी मेहेर , पदवीधर शिक्षक मोतीराम शिंदे , संतोष गरड , सचिन खापरे,अक्षय इंगळे, राहुल इंगळे, सुरेश शिंदे, दादासाहेब शिंदे, विकास शिंदे, अविनाश काशीद, भाऊ शिंदे, गणेश कवडे, अभिजित परबत, बबन लोहार ,श्रीकांत चौधरी,अमोल सातपुते ,रोहन सोनटक्के ,यश जाधव, शंभू लोंढे मनोज लोंढे, प्रमोद लोंढे ,उमेश लोंढे , सुहास लठ्ठे, निलेश गुरव यांनी परिश्रम घेतले .
**************Advt**********************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा