Breaking

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजुरी येथे महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण*


*सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजुरी येथे महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

      राजुरी ता करमाळा येथे  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायतीच्या 15 वा वित्त आयोगाच्या महिला व बाल विकास विभागाच्या  वतीने महिला विकास कौशल्य कार्यक्रमाचे  उद्घाटन बचत गटाच्या महिलांच्या हस्ते करण्यात आले. 
      यावेळी सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश जाधव, नंदकुमार जगताप, भानुदास साखरे, लालासाहेब भोईटे,बचत गटाचे शिंदे साहेब, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ रेखा शिंदे,ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, परशुराम जाधव उपस्थित होते.                      सरपंच डॉक्टर दुरंदे आपल्या मनोगतात म्हणाले, 'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी'  या सावित्रीबाईंच्या उक्तीप्रमाणे आज पर्यंत ज्या देशातल्या महिलांनी पुरुषांप्रमाणे खांद्याला खांदा लावून काम केले ते देश विकसित झालेले दिसतात .                             प्रतिकूल परिस्थिती मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्यांनी  देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली, तेव्हापासून महिला चुल आणि मुल यांसह घराबाहेर पडल्या आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षणामुळे प्रगत झाल्या. आज आपल्या देशातल्या मुली अंतराळवीर झाल्या पंतप्रधान झाल्या कलेक्टर झाल्या हे फक्त आणि फक्त फुले दाम्पत्यांच्या संघर्षमय जीवनामुळे शक्य झाले. देशातील जुन्या रुढी परंपरा अनिष्ट प्रथा सावित्रीबाईंच्या विचारांना मुळे नष्ट झाल्या. यामुळे आज आम्ही सावित्रीच्या जयंतीनिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवणकाम,ब्युटी पार्लर यांचे प्रशिक्षण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्याचे नियोजन केले, याचा पुरेपूर लाभ गावातील महिलांनी घ्यावा यातून आपल्याला छोट्या व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील व येणाऱ्या काळात आपण आत्मनिर्भर होणार यात कसलीही शंका नाही. आपल्या गावच्या माहेर असणाऱ्या  सौ.निशिगंधा जाधव - शेंडे मॅडम यांच्या संस्थे मार्फत आपल्याला पुढील दहा दिवस खूप चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण मिळणार आहे .                   तसेच या निमित्ताने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी प्रकाशित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.                           शाळेतील मुलींनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील विचार व्यक्त केले.सौ.निशिगंधा शेंडे , नंदकुमार जगताप, बचत गटाचे शिंदे   यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आभार प्रदर्शन ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ रेखा शिंदे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा