Breaking

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

माळशिरस मध्ये जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी*


*माळशिरस मध्ये जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी*


*माळशिरस प्रतिनिधी/ वैष्णवी थोरात*
Aj24TaasNews 

माळशिरस, मध्ये जि प शाळा येथे 
मराठा सेवा संघ प्रणित  , जिजाऊ ब्रिगेड तालुका माळशिरस सोलापूर पंढरपूर विभाग जिल्हा परिषद जिल्हा परिषद कन्या शाळा माळशिरस येथे आज मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी  जयंती व बालिका दिन साजरा करण्यात आला . जिजाऊ-सावित्री जयंती व दशरात्रोत्सवाचे  औचित्य साधून प्रथम प्रतिमा पूजन करून जिजाऊ वंदना म्हणण्यात आली शिवमती मनीषा जाधव जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 
जोतिबांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या सावित्रीबाईंचे ‘स्त्रियांनी शिकावे’ हेच ब्रीदवाक्य होते. यावेळी विविध क्षेत्रातील यशस्वी महिला जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थिनींना लेखन साहित्य वाटप करण्यात आले .
आज जरी सावित्रीबाई आपल्यात नसल्या तरी त्यांच्या कार्याचा अंत झालेला नाही,असं म्हटलं जात की आयुष्य जरी थोडे असले तरी तेवढ्या आयुष्यात आपण काय करतो ते महत्वाचे आहे, आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये सावित्रीबाईंचे कार्य महान व आजही अजरामर आहे म्हणुनच त्यांना क्रांतीज्योती असे म्हटले जाते. जिजाऊ ब्रिगेडची प्रेरणा घेऊन जिल्हा परिषद कन्या शाळा येथील सौ प्रतिभा गोडसे व सोनी कानडे व सुवर्णा गोरवे या शिक्षकांना राजमाता जिजाऊंचे पुस्तक भेट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती मनीषा जाधव , जिल्हा उपाध्यक्ष माळशिरस तालुका अध्यक्ष श्रीमती मनोरमा लावंड , उपतालुका अध्यक्ष श्रीमती मनीषा गायकवाड , अकलुज शहराध्यक्ष शुभांगी क्षीरसागर , अकलूज कार्याध्यक्ष शारदा चव्हाण व सुवर्णा गोरवे  जयश्री बीरलिंगे संघटक उपस्थित होत्या . तालुका अध्यक्ष मनोरमा लावंड यांच्या प्रयत्नातून बालिका दिन व सावित्रीबाई जयंती साजरी करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा