*शाळा व्यवस्थापन समिती, परिते च्या अध्यक्षपदी शहाजी मुसळे व उपाध्यक्षपदी समाधान लांडे यांची निवड*
AJ 24Taas News
माढा तालुका प्रतिनिधी/भारत जगताप यास कडून
जि प प्रा केंद्रशाळा, परिते येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यासाठी पालक सभा बोलविण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री राजकुमार क्षिरसागर सर होते.
प्रस्ताविक श्री दिनकर शिंदे सर यांनी केले तसेच शाळा व्यवस्थापन समितीची कार्य काय आहेत ते सांगितले. श्री शंकर थोरात यांनी इयत्तनिहाय सदस्य निवड कशा पद्धतीने करण्यात येणार आहे ते सांगितले.
त्यांनतर खेळीमेळीच्या वातावरणात, सर्व पालकांच्या सहकार्य ने इयत्तानिहाय सदस्य निवड करण्यात आली.
सदस्य म्हणून संजय कटकदौंड, मोहन जगताप, जीवन लांडे, समाधान लांडे, सौ उज्ज्वला विठ्ठल धोत्रे, सौ शोभा संतोष धोत्रे, सौ रेश्मा सुहास पाटील, शहाजी मुसळे, सौ जयश्री गणेश गायकवाड, श्री अशोक मुसळे, सौ संध्या भुजबळ, सौ सारिका राजेंद्र लांडे, समाधान अनभुले, शिक्षणप्रेमी पालक म्हणून नेताजी लांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
*सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी अध्यक्षपदी श्री शहाजी मुसळे व उपाध्यक्षपदी श्री समाधान लांडे यांची निवड केली.*
*माजी अध्यक्ष श्री नेताजी लांडे, माजी उपाध्यक्ष श्री विपुल मेहता व सर्व पालकांनी सर्व नवनिर्वाचित सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.*
यावेळी नेताजी लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच नूतन अध्यक्ष श्री शहाजी मुसळे यांनी शाळेच्या भौतिक सुविधा सुधारणा करणेसाठी, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष नेताजी लांडे, माजी उपाध्यक्ष विपुल मेहता, नूतन अध्यक्ष शहाजी मुसळे, उपाध्यक्ष समाधान लांडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सावंत सर, कोष्टी मॅडम, देशमुख मॅडम, कोळी मॅडम शिक्षक उपस्थित होते.
श्री राजकुमार क्षिरसागर सर यांनी आभार मानले मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा