संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शिवानी जाधव प्रथम
माढा तालुका प्रतिनिधी/भारत जगताप
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतनिमित्त संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी माढा तालुक्याच्या वतीने कर्मवीर लोहकरे गुरुजी माध्यमिक विद्यालय,उजनी (मा.) येथे शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या वक्तृत्व स्पर्धेत शिवानी तानाजी जाधव(इ.१०वी) हिने प्रथम क्रमांक पटकावला तर पूजा सुदर्शन जाधव(इ.९वी) हिने द्वितीय तर ऋतुजा भारत खोत (इ.१०वी) हिने तृतीय क्रमांक पटकावला.कोमल रावसाहेब लोकरे(इ.१०वी) आणि चंदाराणी सदाशिव जाधव(इ.९वी) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले.विजेत्यांना बक्षीस म्हणून क्रमांकानुसार विविध शालेय साहित्य,सन्मानचिन्ह आणि जिजाऊ चरित्र बक्षीस म्हणून देण्यात आले.यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन जगताप,संभाजी ब्रिगेड तालुका संघटक बाळासाहेब वागज,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी चे तालुकाध्यक्ष शंकर नागणे,संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी चे तालुकाध्यक्ष अजय गायकवाड,संभाजी ब्रिगेड परितेवाडी शाखाध्यक्ष सिध्देश्वर सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब जाधव,रामचंद्र जाधव,सचिन सावंत,अतुल लोकरे,प्रशालेचे मुख्याध्यापक काकडे सर,सहशिक्षक सानकरे सर,पिसे सर आदींसह बहुसंख्य पालक उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुका उपाध्यक्ष किरण जाधव आणि सागर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा