महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बिनविरोध तालुकाध्यक्ष पदी अंकुश शिंदे यांची तिसऱ्यांदा निवड
श्रीगोंदा:नितीन रोही
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने श्रीगोंदा येथील कुकडी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ.प्रा.बाळासाहेब बळे, सुनील कारंजकर, अशोक होनराव, उत्तम राऊत यांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी मागील दोन वर्षात दिवंगत झालेल्या पत्रकार बांधवांना तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका पदाधिकारी निवड करण्यात येते. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी तालुकाध्यक्ष पदी दैनिक दिव्यमराठी चे अंकुश शिंदे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड केली. तर साप्ताहिक आवजचे संपादक राजु शेख यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली ज्येष्ठ पत्रकार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेब बळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी शिवाजी साळुंखे, सुभाष शिंदे, दादा सोनवणे,अनिल तुपे, अंकुश तुपे, रामदास कोळपे, प्रमोद आहेर, विजय मांडे, आप्पासाहेब चव्हान, केशव कातोरे, अमोल बोरगे, ज्ञानेश्वर येवले, राम सोनवणे, नंदकुमार कुरुमकर,सर्जेराव साळवे, आदी पत्रकार उपस्थित होते.
शिंदे यांची निवड होताच आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहूल जगताप, काष्टी सेवा संस्थेचे मार्गदर्शक भगवानराव पाचपुते, श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गटनेते मनोहर पोटे, तसेच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकूश शिंदे यांनी केले असून सूत्र संचालन प्रा. केशव कातोरे यांनी केले तर आभार योगेश चंदन यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा