Breaking

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

दरोडयाचा तयारीत असलेले आरोपी जेरबंद श्रीगोंदा-बेलवंडी पोलीसांची संयुक्त कारवाई


दरोडयाचा तयारीत असलेले आरोपी जेरबंद श्रीगोंदा-बेलवंडी पोलीसांची संयुक्त  कारवाई
श्रीगोंदा-नितीन रोही


सविस्तर असे की मनोज पाटील साहेब पोलीस अधिक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल साहेब अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर व  आण्णासाहेब जाधव साहेब उपविभागीय पोलीस कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हेगाराविरुद कारवाई करण्याचे आदेश दिले होते. नमुद सुचना प्रमाणे बेलवंडी पोलीस स्टेशन हददीतील गुन्हेगारांची महिती घेत असताना दि ०६/०१/२०२२ रोजी श्री नंदकुमार दुधाळ पोलीस निरीक्षक, बेलवंडी पोलीस स्टेशन ता श्रीगोंदा यांना गुप्त खब-या कडुन महिती मिळाली की, काही इसम हे पिपंळगाव पिसा ते विसापुर जाणा-या रोडवर कुकडी कॅनॉल सेतु जवळ दरोडया टाकण्याचा इरादयाने उददेशाने फिरत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर महिती मिळाल्याने पोनि / नंदकुमार दुधाळ बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकातील अधिकारी व अंमलदार व श्रीगोंदा पोस्टेचे अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई केली

त्याप्रमाणे पोसई विजयकुमार बोत्रेसफौ अकुंश ढवळे पोकों / २५२० प्रकाश नवनाथ माडगे पोकों २५६९ किरण संजय बोराडे पोकों ३१०अमोल पोपट कोतकर, पोहेकॉ / २०डी आर पठारे, पोहेकॉ खेडकर, पोना शेरकर, पोकॉ शिंदे, पोकों पठारे, अशांनी मिळुन दोन पंचासह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पिपंळगाव पिसा ते विसापुर जाणा-या रोडवर कुकडी कॅनॉल सेतु जवळ ता श्रीगोंदा येथे जावुन सापळा लावुन बातमी मधील वर्णनाचा काही लोक आजुबाजूस संशयीत नजरेने टेहळणी करीत असल्याचे दिसले पोलीस पथकाची खात्री झाल्याने सर्वांनी त्यांना घेराव घालुन ताब्यात घेतले त्यांना पोलीसांनी पंच व पोलीस स्टाफची ओळख सांगुन त्यांची नावे पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नावे १. कुणाल नवकाशा भोसले रा पिपंळगाव पिसा ता श्रीगोंदा २. रवि नंदु पवार रा शेडगे वस्ती पिपंळगाव पिसा ता श्रीगोंदा ३. राहुल चंद्रकांत भोसले रा शेडगे वस्ती पिपंळगाव पिसा ता श्रीगोंदा ४. संदीप चंद्रकांत भोसले रा खरातवाडी ता श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस करून अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये लोखंडी सुरा, हातोडी, कु-हाड, लोखंडी गज, कोयता मिळुन आहे. तसेच एक हिरो डिलक्स कंपनीची मोटारसायकल विना नंबरची ४१.१००/- रूकिं चा मुददेमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.

सराईत आरोपी नामे संदीप चंद्रकांत भोसले रा खरातवाडी ता श्रीगोंदा यांचे विरूध्द बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं ५९७/२०२० भादवि ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल असुन तो गुन्हा घडल्यापासुन फरार आहे.

सदर कारवाई मा. श्री मनोज पाटील साहेब पोलीस अधिक्षक अहमदनगर श्री सौरभ कुमार अग्रवाल साहेब अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर व श्री. आण्णासाहेब जाधव साहेब उपविभागीय पोलीस कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस अधिकारी व अंमलदार व श्रीगोंदा पोस्टेचे अंमलदार यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा