विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित केल्याबद्दल तरुणावर गुन्हा दाखल
महाड – प्रतिनिधी
बैलगाडी शर्यत आयोजनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन न करता तसेच कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन करत विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित केल्याबद्दल एका तरुणावर महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव सुशांत रूपक जाधव (रा. आसनपोई) असे असून त्याने २७ डिसेंबर २०२१ या तारखेला महाड तालुक्यातील दहिवड या गावी एका मोकळ्या मैदानावर बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. आयोजन करताना आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन केले नाही. यासाठी आवश्यक असणारी जिल्हाधिकार्यांची लेखी परवानगी तसेच पशुसंवर्धन विभागाचे शर्यतीपूर्वी जनावरांची तपासणी करणारे प्रमाणपत्र व शर्यतीच्या ठिकाणी जनावरांच्या प्रथमोपचारसाठी आवश्यक असणारी तयारी शर्यतीच्या ठिकाणी केलेली नव्हती. तसेच या शर्यती च्या ठिकाणी कोरोणा विषयक नियमांचे पालन न करता गर्दी देखील जमवण्यात आलेली होती. याबाबत तहसीलदार यांच्या आदेशानुसार सुग्राम सोनवणे (तलाठी ) यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर १४ जानेवारी २०२२ ला या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार व्ही. पी. पवार अधिक तपास करत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा