Breaking

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

प्रशांतच्या त्रासाला कंटाळून अखेर आरतीने जीव संपवला**रांझणी येथील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या*


*प्रशांतच्या त्रासाला कंटाळून अखेर आरतीने जीव संपवला*

*रांझणी येथील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या*


टेंभुर्णी (प्रतिनिधी) :- गुरुवार रात्री नऊ वाजता आरती पोपट चव्हाण वय 21 वर्षे राहणार रांझणी तालुका माढा या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अशी फिर्याद पोपट तुकाराम चव्हाण राहणार रांझणी तालुका माढा यांनी शुक्रवारी पहाटे 2: 33 वा.दिली.

वरील घटनेची माहिती अशी की आरोपी प्रशांत संजय काळे राहणार आलेगाव बुद्रुक तालुका माढा हा गेल्या दीड महिन्यापासून आरतीला दम देत होता की तू माझ्यासोबत लग्न कर,तू माझ्यासोबत लग्न नाही केले तर मी तुझे लग्न दुसऱ्या कोणाबरोबर होऊ देणार नाही, मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन, तुझे माझे सोबतचे फोटो तुझ्या नातेवाईकांना मोबाईल वरून व्हायरल करीन अशी धमकी देत सतत तिला देत होता.त्यामुळे तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले.आज मकर संक्रांत या सणावर रांजणी व रांजणी परिसरात तील जनतेमध्ये दुःखाचे सावट पसरले. सुशिक्षित असलेल्या मुलीने असे कृत्य केले म्हणून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा