*स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले प्रतिष्ठान कडून शंभूराजे राज्याभिषेक सोहळा साजरा*
आज दिनांक 16 जानेवारी 2022, रविवार रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 324व्या राज्याभिषेक दिनानिमित्त मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, सुपे परगणा, बारामती, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा, राजे प्रतिष्ठान बारामती, मयुरेश्वर प्रतिष्ठान सुपे परगणा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, सुपे परगणा. सुपे परगणा ग्रामस्थां कडुन त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे, सहअध्यक्ष शिवश्री अतुल ढम, सुशांत जगताप (मयुरेश्वर निधीलि, सुपे),तुषार हिरवे( व्हा, चेअरमन मयुरेश्वर निधी सुपे) महेश चांदगुडे सर,माजी सरपंच सुपे दादा कुतवळ,ख्वाजा मन्सूर ट्रस्ट अध्यक्ष युनूस भाई कोतवाल मुनिर डफेडार, फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष गणेश खैरे जीवन साधना फाउंडेशन अध्यक्ष जयराम आप्पा कुंभार मराठा सेवा संघ करमाळा तालुका अध्यक्ष अतुल वारे सुपे पोलीस स्टेशन येथील ASI मोहरकर नाना सुपे ग्रामस्थ सर्व संघटनांचे पदाधिकारी व सुपे परगण्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी उपस्थित मान्यवरांचे पुस्तके वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चांदगुडे सर यांनी केले. भिमा वाघचौरे याने गारद देऊन आभार प्रदर्शन मानले. यावेळी कोरोना सुरक्षाविषयक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा