दिव्यांग बांधवांना दिव्यांग भवनाची मागणी-राजेंद्र पोकळे
श्रीगोंदा-नितीन रोही
श्रीगोंदा तालुक्यातील असंख्ये दिव्यांग बांधन हे त्याचे विविध कामकाजासाठी श्रीगोंदा येथे येत असतात त्यावेळी त्यांना संपर्कासाठी व त्यांची बसण्याची अत्यत गैरसोय होत असते तरी सदरील दिव्यांग बांधवांचे दैनंदिन काम तहसिल कार्यालय अगर अन्य कार्यालयामध्ये असलेवर त्यांना संपर्काकरीता व विश्राम करीता श्रीगोंदा शहरात शासकीय जागा उपलब्ध करुन देवून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवासाठी भवनाचे बांधकाम करून त्यांची होणारी गैरसोय दूर करून उपकृत करावे अशी विनंती
मा.ना. उध्दवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री,बच्चु कडु साहेब राज्यमंत्री,जिल्हाधिकारी साहेब,
तहसीलदार,मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे अध्यक्ष राजेंद्र पोकळे,शंकर पानसरे,हरिभाउ खामकर,सुरेश गलांडे,डॉ. सोमनाथ देवकाते, सचिन तोडकर,सचिन ढोले,सौ. सविता शितोळे/मोटे यांनी केली आहे.
फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा