Breaking

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

पंधरा लाख रुपये चेक बाऊन्सप्रकरणी व्यापाऱ्याविरुध्द न्यायालयात**प्रोसेस इश्युचा हुकूम*

*पंधरा लाख रुपये चेक बाऊन्सप्रकरणी व्यापाऱ्याविरुध्द न्यायालयात प्रोसेस इश्युचा हुकूम*


*AJ 24Taas News Network


सोलापूर :- न्यु पाच्छा पेठ यातील पुर्व भागातील व्यापारी रमेश जाधव यांचे विरुध्द
फिर्यादी सुदर्शन जोशी याने दाखल केलेले चेक बाऊन्स प्रकरण केसकामी आरोपी रमेश जाधव यांचे विरुध्द प्रथम वर्ग न्पायदंडाधिकारी  मे. मिसाळ न्पायाधीश  न्यायालयाने आरोपी रमेश जाधव  विरुध्द प्रोसेस इश्युचा हूकूम केलेला आहे.

*यात सविस्तर हकीकत अशी की,*

 फिर्यादी सुदर्शन जोशी यांने आरोपी रमेश जाधव यांचे पाच्छा पेठ येथील घरजागा खरेदी करण्याचे उद्देशाने तीस लाख रुपये आरोपीस साठेखतापोटी दिलेले होते व आरोपीने जागेचा व्यवहार पुर्ण न करता साठेखत व्यवहार रद्द करुन फिर्यादीस रक्कम परत देणे कामी फिर्यादी सुदर्शन जोशी यांना पार्टपेमेट पोटी पंधरा लाखाचा चेक आरोपीने फिर्यादीस दिला होता. व सदरील चेक फिर्यादीने बँकेत वटण्याकामी भरले असता  चेक बाऊन्स होवून परत आला व आरोपीस याबाबत सांगितले असता आरोपीने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामूळे आरोपीस फिर्यादीने अँड.श्रीनिवास
कटकूर यांचे मार्फत नोटीस दिली तरी परंतू आरोपीने चेकची रक्कम दिलेली नाही. त्यामूळे
शेवटी नाईलाजास्तव सोलापूर येथील मे.ज्युडिशियल मॅजीस्ट्रेट कोर्ट न्यायाधीश श्री मिसाळ साहेब यांचे कोर्टात दि-निगोशिएबल इन्स्ट्रयुमेंट अँक्ट कलम १३८ अन्वये आरोपी श्री. रमेश जाधव यांचे विरुध्द चेक बाऊन्सची केस अँड. श्रीनिवास कटकूर यांचेमार्फत दाखल केली, असता मे.कोर्टाने याची गंभीर दखल घेवून फिर्यादीचा जबाब घेवून व वकिलांचे युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी विरुध्द दि-निगोशिएबल इन्स्ट्रयुमेंट अँक्ट कलम १३८ अन्वये प्रोसेस इश्युचा हुकूम केलेला आहे.व आरोपीस पुढिल तारखेस हजर राहणेसाठी मे. कोर्टामार्फतसमन्स जारी करण्यात आला.
*याकामी फिर्यादी रमेश जाधव यांचे तर्फे अँड. श्रीनिवास कटकूर अँड. किरण कटकूर, अँड. आनंद सागर यांनी काम पाहिलेले आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा