Breaking

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

तुळजाभवानी महाविद्यालयात विवेकानंद सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम*



*तुळजाभवानी महाविद्यालयात विवेकानंद सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम*



*AJ 24 Taas News Maharastra Network/-प्रतिनिधी- रूपेश डोलारे ,उस्मानाबाद


तुळजापूर,दि.१७, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे विवेकानंद सप्ताह अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानशिदोरी उपक्रमांतर्गत मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते,




सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य प्रोफे.डॉ.मेजर वाय.ए.डोके यांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ शिवाजीराव देशमुख यांनी उपस्थितांना ग्रंथ वाचनाचे महत्व विशद केले,सदर कार्यक्रमासाठी ग्रंथपाल दिपक निकाळजे यांनी पुढाकार घेतला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा व्ही.एच.चव्हाण यांनी तर आभार प्रा सोहन कांबळे यांनी मानले,सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच १२ वी चे विद्यार्थी उपस्थित होते, यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा