आदिवासी बांधवाना ब्लॅंकेट वाटप
जनसंवाद आणि बाबूलाल जैन यांच्या संयुक्त विद्यमातुन कार्यक्रमाचे अयोजन
महाड - प्रतिनिधी
महाड तालुक्यातील सापे, दहिवाड आणि वाकी आदिवासी वाडीवर आदिवासी कुटुंबाना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. महाड मधील व्यापारी बाबूलाल जैन आणि जनसंवाद रूरल डेव्हलपमेंट अँड सोशल असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.
महाड मधील सुप्रसिद्ध व्यापारी बाबूलाल जैन आणि जनसंवाद रुरल डेवलपमेंट अंड सोशल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट वाटप मकर संक्रातीच्या दिवशी करण्यात आले. यावेळी पत्रकार निलेश पवार, बाबूलाल जैन, गोपाल कांबळे, अनंत कांबळे, मिलिंद माने, आदी उपस्थित होते. महाडमधील दुर्गम अशा सापे आदिवासीवाडी, दहिवड आदिवासीवाडी, वाकी आदिवासीवाडी, या ठिकाणी अतिशय खडतर जीवन जगत असलेल्या आदिवासी बांधवांना थंडीच्या काळात ब्लॅंकेट वाटप महाडमधील रत्नदीप ज्वेलर्सचे मालक बाबूलाल जैन यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी बोलताना बाबूलाल जैन यांनी आपण कमावत असेलेल्या उत्पन्नातून काही भाग हा समाजाच्या विकासाकरता देणेकरी असतो असे सांगून आदिवासी मुलांनी निर्व्यसनी राहत आपल्या समाजाचा विकास केला पाहिजे असे सांगितले. तर संस्थेचे अध्यक्ष पत्रकार निलेश पवार यांनी आदिवासी घटकाने आपल्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याकडे प्राधान्य दिले पाहिजे शिक्षण घेतल्यामुळे समाजाचा विकास करता येईल आणि आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल असे मार्गदर्शन केले. या ठिकाणी उपस्थित असलेले निवृत्त मुख्याध्यापक अनंत कांबळे यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे सांगून आदिवासी समाजाने आपल्या जुन्या रूढी परंपरा बाजूला ठेवून काळाप्रमाणे बदलले पाहिजे याकरता या करता मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून जमणार नाही असे स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा