*गौडगाव ते उपळे (दुमाला) या दोन केंद्राचे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
आज दि.31/12/2021 वार शुक्रवार रोजी गौडगांव व उपळे(दुमाला) या दोन केंद्राचे शिक्षण परिषद उत्साहात पार पडली.या परिषदेस श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.विनायकराव गरड (बप्पा) होते.सदर प्रशिक्षणास प्रशिक्षण संस्था वेळापुरचे आधिव्याख्याता श्री.शशिकांत शिंदे साहेब, डायट जि.सोलापूर व केंद्र प्रमुख उत्तम धोत्रे,मोरे सर तज्ञ मार्ग दर्शक,व मल्टि पर्पज प्रशालेचे प्राचार्य आप्पासाहेब प्रतापराव कुतवळ सर,सर्व प्रशिक्षणार्थी हजर होते.उपळे बीट मधील सर्व माध्यमाचे शिक्षक व शिक्षिका सर्व जि.प.शाळांचे मुख्याध्यापक हजर होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा