प्रजासत्ताक दिनी होणार महाडच्या सुपुत्राला पोलीस पदकाचा सन्मान
महाड – प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक देऊन सन्मान करते. त्यामधील बहुमान आज महाड तालुक्यातील नागाव गावातील रहिवाशी परंतु मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले मिलिंद गणेश नागावकर यांना पोलिस पदक प्राप्त झाला आहे.
महाड तालुक्यातील नागाव गावचे सुपुत्र असलेले मिलिंद गणेश नागावकर १८/०६/१९८८ रोजी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदावर दाखल झाले. पोलीस दलात काम करत असताना उल्लेखनीय कार्य करीत राहणे हे धोरण त्यांनी सेवेत अवलंबिले. असेच उल्लेखनीय काम करीत असताना त्यांची मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक मुख्य गुप्त अधिकारी एस. आय. डी. या पदावर उल्लेखनीय काम केले. या उल्लेखनीय कामाची दखल राज्य पोलीस दल व केंद्रीय गृह मंत्रालय यांनी घेवून त्यांना आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदक देण्याचा निर्णय जाहीर झाला. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील पोलिसांना त्याचा आनंद वाटत आहे.
मिलिंद गणेश नागावकर हे महाड तालुक्यातील नागाव गावातील मूळचे रहिवाशी असून ते मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असले तरी त्यांची नाळ गावच्या मातीची कायम राहिलेली आहे. आज त्यांच्या पोलीस पदकाच्या पुरस्कारामुळे गावात आनंद व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा