Breaking

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

प्रजासत्ताक दिनानिमित्त बहिर्जी नाईक यांचे स्मरण



प्रजासत्ताक दिनानिमित्त बहिर्जी नाईक यांचे स्मरण

अकलूज/प्रतिनिधी:-प्रजासत्ताक दिनाच्या औचीत्याने अकलूज परिसरातील शिवभक्तांनी शिवभक्त किरण भांगे यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजीराजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले बानुरगड(भूपाळगड) ता.खानापूर येथे मोहीम आयोजित केली होती.जागतिक कीर्तीचे राष्ट्रीय व्यक्तिमत्व,जगातील गुप्तहेरांचे प्रेरणास्त्रोत 
स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन 
त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज,बहिर्जी नाईक यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.यावेळी शंकरराव मोहिते महाविद्यालय रासेयो. व इतिहास विभागाचे विद्यार्थी वैभव थोरात,नागनाथ साळवे,प्रशांत वाघमारे,महादेव चव्हाण,मनोज साठे,सत्यजीत चव्हाण,शुभम शिंदे,आकाश निंबालकर,मनोज यादव,प्रमोद चव्हाण,वैभव गुजर इ.या मोहिमेत सहभागी झाले होते.यावेळी पिलीव तेथील जहागीरद्यार याच्या ऐतिहासीक गडीला भेट देण्यात आली.
------------------------
   युवकांमध्ये शिवचरित्राचा व्यासंग निर्माण व्हावा या उद्देशाने प्रत्येक महिन्यामध्ये विविध गडकिल्ल्यावर मोहीम आयोजित केली जाणार आहे.शिवभक्तांनी सामील व्हावे.
      - किरण भांगे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा