पिलिव येथे संग्रामसिंह जहागीरदार यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घघाटन
*AJ 24 Taas News Maharastra--पिलिव प्रतिनिधी/ प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलिव येथे संग्रामसिंह जहागीरदार यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घघाटन करण्यात आले .या मध्ये घुमट मळा येथे सिमेंट रस्ता करणे , प्रवीण वाघमारे घर ते पाणी पुरवठा टाकी पर्यंत पाइपलाइन करणे , खरे घर ते सुनील बुगड घर पर्यंत बंदिस्त गटार करणे , कोष्टी गल्ली येथे अंगणवाडी शेड बांधणे , बाजार पटांगणावर बाजार कट्टे बांधणे ,सर्व अंगणवाड्या ना स्वचछतागृह बांधणे , सार्वजनिक आरोग्य जनजागृती करणे व आवश्यक उपाययोजना करणे , जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक वर्गात अभ्यासासाठी स्मार्ट टिव्ही व अभ्यासक्रम देणे , एस्टी स्टँड परिसरात स्वच्छ्ता गृह करणे ,ग्रामपंचायत ते मारुती मंदिर बंदिस्त गटार करणे , ग्रामपंचायत कार्यालयास स्वच्छ्ता गृह बांधणे , राम गल्ली जोशी घर ते कोळी घर बंदिस्त गटार बांधणे ,चैतन्य नागरी पतसंस्था परिसरात बंदिस्त गटार बांधणे , दुलेखान तांबोळी. घर ते शिवा बंडलकर घर बंदिस्त गटार बांधणे , प्रकाश खलीपे घर ते राजकुमार फासे घर बंदिस्त गटार बांधणे , पाटील वस्ती ते मोहिते वस्ती रस्त्यावर पुल बांधणे या सर्व कामांचा आमचा गाव आमचा विकास अंतर्गत सर्व कामाचे उद्घाटन पशू संवर्धन विभाग माजी सभापती जिल्हा परिषद सोलापूर संग्रामसिंह जहागीरदार यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील ,सरपंच नितीन माळी , उपसरपंच संजय आर्वे , ग्रामविकास अधिकारी अनिल सावलजकर , ग्रां प सदस्य दत्तू बोडरे , ग्रां प सदस्य सोनाली करमाळकर , शमशाद काझी , अनिता जेऊरकर , जयसिंह जहागीरदार ,अविनाश जेऊरकर , सोमनाथ देशमुख , माजी सरपंच उमेश बोडरे , तानाजी लोखंडे , मोहसीन शेख , भैया जामदार , प्रवीण वाघमारे , रघुनाथ देवकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा