Breaking

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

वंचित बहुजन आघाडी सोलापूर पश्चिम तर्फे ,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना त्यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन करण्यात आले.



वंचित बहुजन आघाडी सोलापूर पश्चिम तर्फे ,
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना त्यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन करण्यात आले.


टेंभुर्णी(प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर, जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, जिल्हा संघटक शरीफ काझी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हे अभिवादन करण्यात आले..., जिल्हा संघटक शरीफ काझी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व फुले वाहण्यात आली.


यावेळी शरीफ काझी यांनी सावित्री माय बद्दल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मुलींचे जेव्हा लग्न ठरवतात तेव्हा तुमची मुलगी किती शिकली आहे हे विचारतात. कोणी हे नाही विचारत की तुमची मुलगी कोण कोणते व्रत करते, कोणत्या देवाला पुजते. त्यामुळे मुलींनी काल्पनिक व्रत, पूजा-पाठ करण्यापेक्षा सावित्री माईंची शिकवण अनुसरून खूप शिकले पाहिजे.

जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, पुरुषांसारखं आयते स्वातंत्र्य कधी स्त्रीला मिळालं नाहीये आणि आजही ते मिळत नाहीये.
ते मिळवण्यासाठी तिला झगडायला लागतं आणि ती झगडण्याचा प्रयत्न करतेय.
एवढं करूनही किती स्त्रिया या कमावत्या असुनही आजही शोषणाला बळी पडत असतात.
आणि या शोषित स्त्रियांनी एकजूट होऊन सावित्री माईचा वसा व वारसा पुढे घेऊन संघर्ष करण्याची गरज आहे.

महासचिव विशाल नवगीरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सावित्रीमाईवर शेण,दगड, कचरा फेकण्यात येत असे, शिवीगाळ केली जात असे,त्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली..! आजच्या प्रत्येक स्त्रीने व मुलींने साऊ बनून ही ज्योत पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे व आपला अंधकार मिटवणे गरजेचं आहे.
यावेळी विशाल दादा मिसाळ, गणेश खरात, तात्यासाहेब सरवदे, विक्रम खरात, जुगल खरात, निखिल खरात, आकाश शिंदे, किरण कांबळे, राजु वाघमारे, योगेश वाघमारे, शुभम शिरसट, नितीन कांबळे, संकेत शिंदे, अमर मोरे, प्रसिद्धी प्रमुख रंजीत गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा